जर मला मरणेच आहे
Translated to Marathi by @Chamelea22जर मला मरणेच आहे
तर तुम्हाला जगणेच आहे
माझी कथा सांगण्यासाठी
माझ्या वस्तू विकण्यासाठी
आणि खरेदी करण्यासाठी
एक कापडाचा तुकडा
आणि काही धागे
(ते पांढऱ्या रंगाचे व लांब शेपटीचे बनवा)
म्हणजे गाझामध्ये कुठेतरी एक मूल
जेव्हा स्वर्गाच्या डोळ्यात डोळे घालून पाहत असेल
आपल्या बापाची वाट पाहत - तो बाप
ज्याने कोणाचाही निरोप नाही घेतला
स्वतःच्या देहाचा पण नाही
स्वतःचा पण नाही -
तो पतंग पाहील, माझा पतंग तुम्ही बनवलेला, उंच उडणारा
आणि क्षणभर चिंतेल एका देवदूतचं अस्तित्व
जो प्रेम परत घेऊन येत आहे
जर मला मरणेच आहे
तर माझा मृत्यू आ णू दे आशा
असूदे एक कथा